अतिदक्षता म्हणून मळोली गाव बंद, अहवाल तपासणीसाठी पाठविले



Maloli-village-closed-as-a-precaution-report-sent-for-investigation

लग्नसमारंभ साठी बाहेरून आलेली एक व्यक्ती तिकडे पॉझिटिव्ह आल्याने त्यांचे संपर्कात आलेले मळोली येथील काही जणांना प्रशासनाकडून विलगीकरण करण्यात आले असून त्यांच्यातील आठ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ते अजून प्रलंबित आहेत. 
मळोली मध्ये आतापासून अतिदक्षता म्हणून पूर्ण मळोली  गाव बंद राहणार आहे. 
 दूध व्यवसायिक सकाळी 6 :30 ते सकाळी 8:00 पर्यंत व संध्याकाळी 6:30 ते 8:00 वाजेपर्यंत चालू राहतील व सर्व ग्रामस्थ यांनी मास्क वापरणं ,बंधनकारक असून न वापरण्यात येणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल होतील व दंड आकारला जाईल तसेच गावातील सर्व किराणा माल व भाजी मार्केट बंद राहील या व्यतिरिक्त फक्त आत्यावश्यक सेवा फक्त मेडिकल चालू राहतील मेडिकल वगळता इतर संपूर्ण मळोली गाव पूर्णतः बंद राहील.
पुढील आदेश पर्यंत घरातून कोणीही बाहेर पडायचे नाही. 
पुढील आदेश येईपर्यंत आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर व ग्रामस्थ यांच्यावर कठोर कार्यवाही होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 


No comments