कंपनीमध्ये झाला मोठा स्फोट, दोन जण जागीच ठार
इंडिया स्टील ही कंपनी रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात आहे. दरम्यान स्फोट चे कारण अद्याप समोर आले नसले तरी हा गॅस सिलेंडर चा स्फोट असल्याचे बोलले जात आहे.
सोमवारी रात्री एक वाजण्याच्या आसपास लोखंड वितळून भट्टीत टाकत असताना हा स्फोट झाला असल्याचे सांगितले जात आहे. हा स्फोट एवढ्या गंभीर स्वरूपाचा होता की यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या दोन कामगारांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले आहेत.
Post Comment
No comments