सांगोला । क्वारंटाइन न राहिल्यामुळे सहा जणांवर गुन्हा दाखल



Sangola-Charges-filed-against-six-persons-for-not-quarantine

बाहेर गावाहून सांगोला मध्ये येऊन क्वारंटाइन सेंटर मध्ये न राहिल्यामुळे सांगोला पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे येथून सुभाष चिमणे, बाळू शेंडगे, अर्जुन माने, दादा कोळी, सागर कोळी, मारुती पारखे, सर्व रा. सांगोला हे पुणे येथून आपल्या गावी खाजगी वाहनाने आले होते. त्यांची तपासणी करून त्यांना क्वारंटाइन सेंटर मध्ये १४ दिवस राहण्याची सूचना आरोग्य विभागाने दिली होती. मात्र शासनाचे नियम न पाळता हे सर्वजण क्वारंटाइन सेंटर मध्ये राहण्यास नकार देत असल्याने त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


No comments