अनलॉक 4 । पहा काय होणार सुरू, काय राहणार बंदच !!

 


unlock 4 : केंद्राच्या मार्गदर्शक सूचना, बघा काय सुरू आणि काय बंद?

 १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अनलॉक ४ साठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार केंद्र काही गोष्टींना परवानगी दिली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या मार्गदर्शक सूचना लागू राहतील.




हे सुरू होणार !


- मार्गदर्शक सूचनांनुसार ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू केल्या जातील


- २१ सप्टेंबरपासून १०० नागरिकांची उपस्थिती असेल असे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम आयोजित करता येतील. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); अशा कार्यक्रमांमध्ये किंवा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हँडवॉश, थर्मल स्कॅनिंग करणं बधनकाकर असेल


- ओपन एअर थिएटर २१ सप्टेंबरपासून खुली करण्यास परवानगी आहे


- २१ सप्टेंबरपासून ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शाळेत येण्याची परवानगी


- २१ सप्टेंबरपासून शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ऐच्छिक आधारावर (कंटेन्मेंट झोन बाहेरील) ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येईल


- २१ सप्टेंबरपासून तांत्रिक आणि व्यवसायिक शिक्षण असलेल्या (ज्यासाठी प्रयोगशाळा आवश्यक आहे) उच्च शिक्षण क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थी आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था सुरू होतील.



हे बंदच राहणार !


- कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लॉकडाउन कायम असेल. तिथल्या नियमांमध्ये कुठलेही शिथिलता दिली जाणार नाही. कंटेनमेंट झोनमधील नियम सक्तीने पाळले जातील.


- चित्रपटगृह, इंटरनेट पार्क


-स्विमिंग पूल बंदच राहतील

No comments