उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यास पंकजाताई मुंढे यांची भेट
वेळापूर ता. २६ : माळशिरस येथील पंचायत समितीच्या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आटपून पंढरपूर कडे जाताना वेळापूर ता. माळशिरस येथील उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यास ना. पंकजाताई मुंडे यांनी आज संध्याकाळी भेट दिली. संध्याकाळी उशिरा वेळापूर येथील पालखी चौकात मुंढे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारला त्यानंतर त्यानी उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यास भेट दिली. यावेळी त्यांनी बंगल्यात चहा घेतला व त्यानंतर त्या पंढरपूरकडे रवाना झाल्या. पंकजाताई मुंढे याना भेटण्यास परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
No comments