वेळापूर बंदला संमिश्र प्रतिसाद

वेळापूर लाइव्ह टीम । वेळापूर
वेळापूर येथे आज ता. २६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून वेळापूर बंदची हाक देण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या या हाकेला वेळापूरात संमिश्र असा प्रतिसाद मिळाला.
गुरुवार ता. २५ रोजी माळशिरस पंचायत समिती येथील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा नामोल्लेख असलेली भूमीपूजनाची कोनशिला काढून टाकण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कडून या घटनेच्या निषेधार्त वेळापूर बंदची हाक दिली होती.
वेळापूर मधील एस टी स्टँड, व्यापारी पेठ, जुने बाजारतळ ह्या ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात आला होता मात्र पालखी चौक वेळापूर येथील परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
वेळापूर व परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वेळापूर पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

No comments