भटक्या विमुक्त समाजाच्या विविध दाखल्यांसाठी वेळापूर मध्ये शिबीर

वेळापूर लाइव्ह टीम । वेळापूर
वेळापूर ता. २५
वेळापूर, ता. माळशिरस येथे गुरुवार ता. २५ रोजी भटक्या विमुक्त समाजातील लोकांना मोफत  जातीचे दाखले , रेशनकार्ड , आधारकार्ड , मतदार यादीत नोंद व संजय गांधी निराधार योजनेत नाव नोंदणीसाठी शिबीर घेण्यात आले.
शिबिराच्या सुरवातीला भटक्या विमुक्त विकास मंचाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सूर्यकांत भिसे यांनी प्रास्ताविक मध्ये नागरिकांना शिबिराची माहिती दिली. तर तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्यासमोर समाजाच्या विविध अडचणी मांडल्या. तहसीलदार श्रीमती माने यांनी या शिबिराचे आयोजन भटक्या विमुक्ताना शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ मिळवा यासाठी केले असल्याचे सांगितले तर प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी शासनाच्या विविध योजना व त्यासाठीच्या कागदपत्रांची माहिती यावेळी नागरिकांना दिली.
यावेळी प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार श्रीमती माने, नायब तहसीलदार काळे, सरपंच नंदाबाई वाघे, वेळापूर विकास सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, अर्धनारी नटेश्वर देवालय ट्रस्टचे अमृतराज माने देशमुख, सर्व तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, कर्मचारी आदी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन वेळापूरचे गाव कामगार तलाठी श्री.गुंजाळ यांनी केले.

No comments