वेळापूरात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी
वेळापूर लाइव्ह टीम । वेळापूर
वेळापूरमध्ये गुरुवार ता. २५ रोजी दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्री नवतरुण गणेशोत्सव मंडळ व प.पू. डॉ. भाईनाथ महाराज गणेशोत्सव मंडळ वेळापूर यांच्यातर्फे व्यापारी पेठ वेळापूर येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे सरकारच्या नियमांचे पालन करीत ही दहीहंडी फोडण्यात आली.
या कार्यक्रमासाठी श्री नवतरुण गणेशोत्सव मंडळ व प.पू. डॉ. भाईनाथ महाराज गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून वेळापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
(संग्रहित छायाचित्र)
Nice....
ReplyDelete