सुदेश बनकर सेट परिक्षा उत्तीर्ण

वेळापूर लाइव्ह टीम । खुडूस
खुडूस, ता. माळशिरस येथील सुदेश बनकर यांनी २९ मे २०१६ रोजी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचेमार्फत घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत भूगोल विषयात यश संपादन केले.
सुदेश बनकर यांचे प्राथमिक शिक्षण महालिंगेश्वर विद्यालय खुडूस येथे झाले असून त्यांनी आपली बीए पदवी शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथून घेतली आहे. त्यानंतर त्यांनी केबीपी कॉलेज पंढरपूर येथून आपले एमए पूर्ण केले आहे.
या यशाबद्दल बनकर यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आबासाहेब देशमुख, भूगोल विभागाचे प्रमुख प्रा.गुजर, प्रा. ताटे यांनी अभिनंदन केले.
सुदेश बनकर यांच्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

No comments