लोकविकास कनिष्ठ महाविद्यालयास वाणिज्य शाखेस शासनाची मंजुरी

लोकविकास शिक्षण प्रसारक संस्था ,नेचर पाॅईट वेळापूर संचलित मराठी माध्यमाच्या कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य व शास्त्र शाखेस दिनांक 17 जून २0१६ च्या शासन निर्णय क्रमांक —एस एफ एस —1016/प्र.क्र69/एस एम —2 नुसार सन 2016—17 पासून शासनाची मंजुरी मिळालेचे अध्यक्षा सौ वैशाली बनकर यांनी सांगितले.
      संस्थेत इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळेत नर्सरी   ते बारावी पर्यतचे विद्याथी शिक्षण घेत असून त्याना ने-आण करण्यासाठी बस सुविधा आहे.वेळापूर चौकापासून अर्धनारी नटेश्वर मंदिराच्या पाठीमागे निसर्ग रम्य अशा नेचर पाॅईट या ठिकाणी अवघ्या दीड कि.मी अंतरावर शाळेची सुसज्ज इमारत आहे.
शाळेपासून पिसेवाडी,म्हेत्रेमळा,बनकरवस्ती,कुदळेवस्ती,साळुंखेवस्ती,शेरी नं 1 ,शेरी नं. 2 , भाकरेवाडी,निमगाव,खुडुस,खंडाळी,राऊत गट,आडतवस्ती,माळेवाडी,उघडेवाडी,तोंडले,बोंडले,चव्हाणवाडी,भवानीनगर,मळोली इ.गावे व वाड्या वस्त्या काही अंतरावर असलेल्या गोर-गरीब विद्याथ्याना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.
     वेळापूर मध्ये इयत्ता 11 वी व 12 वी ची वाणिज्य शाखा नसल्याने परिसरातील मुला-मुलींना याचा फायदा होणार आहे.सध्या वाणिज्य व शास्त्र शाखेकडे मुलांचा प्रवेश घेण्याचा कल वाढलेला आहे.संस्थेकडे 11वी व 12वी सायन्स शाखेचे वर्ग चालू असून एबी व अॅग्रीकल्चर सायन्स अँन्ड टेक्नाॅलाॅजीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
      सन 2016—17 या शैक्षणिक वर्षात उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक व्हीओसी-2016/प्र.क्र.140/व्यशि-4नुसार क्राॅप सायन्स 200 मार्कस या विषयास  शासनाची मान्यता मिळाली आहे.या साठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा निर्माण केली आहे.वेळापूर सारख्या ग्रामीण भागात इंग्रजी,मराठी,सेमी इंग्रजी इ.बाबी शिक्षण देणारी संस्था असलेने पालक विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
लोकविकास पतसंस्थेचे उपाध्यक्ष भागवत गायकवाड, सावित्रीबाई महिला पतसंस्था उपाध्यक्ष अर्चना वाघ,संचालक रमेश बनकर आनंद बनकर,सोमनाथ बनकर,गोरख बनकर,विठ्ठल म्हेत्रे,सावता म्हेत्रे, डाॅ.मोहन देवकते,भिमराव बनकर,लक्ष्मण वाघ संजय भाकरे  यांच्या सहकार्यातुन अल्पावधित संस्थेने प्रगती केली असून भविष्यात संस्था नावारूपाला येईल असे संस्थापक जालिंदर बनकर यांनी सांगितले.

No comments