सुयश जाधवचा रिओ ऑलिम्पिक मध्ये सहभाग
वेळापूर ता. १३
वेळापूर येथील इंग्लिश स्कुल वेळापूरचा माजी विद्यार्थी सुयश नारायण जाधव हा ब्राझील येथे सुरु असलेल्या पॅरा ऑलिम्पिक मध्ये जलतरण स्पर्धेत ५० मीटर फ्रीस्टाईल, ५० मीटर बटरफ्लाय व २०० मीटर वैयक्तिक मिडले या विविध प्रकारात खेळला आहे.
५० मीटर फ्रीस्टाईल, ५० मीटर बटरफ्लाय व २०० मीटर वैयक्तिक मिडले या तिन्ही प्रकारात ऑलिम्पिक खेळणारा सुयश हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
सुयशने आजपर्यंत ऑल इंडिया जलतरण स्पर्धेत विविध पदकांची लयलूट करीत बेस्ट स्विमर, चॅम्पियनशिप मिळवल्या आहेत. जर्मनी,रशिया व पोलंड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कास्य, रौप्य, सुवर्ण अशी पदके मिळवून सुयशने ऑलिम्पिक स्पर्धेसाठी झेप घेतली होती.
आपल्या सामन्यानंतर सुयशने फेसबुकद्वारे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, प्रशिक्षक कल्पना आगाशे, अशोक देशपांडे यांचे आभार मानले.
ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेऊन सुयशने वेळापूरसह संपूर्ण तालुक्याची मान जगभरात उंचावली आहे त्यामुळे विविध स्तरांतुन सुयशने कौतुक होत आहे.
No comments