तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत जि प पिसेवाडी संघ उपविजेता

वेळापूर ता. १३
शालेय क्रीडा स्पर्धा  वयोगट 14 वर्ष मुले वेळापूर पालखी चौक मैदानावर पार पडल्या  यामध्ये  जि प शाळा पिसेवाडी संघाने पहिल्या फेरीत वाघोली हायस्कूल संघाचा पराभव करून दुसर्या फेरीत सहकार महर्षि शंकरराव मोहिते  पाटील विद्यालय  वेळापूर  या संघाचा पराभव केला.नंतर च्या फेरीत  तरंगफळ विद्यालयाचा फराभव करून स मा वि अकलूज बरोबर झालेल्या सेमी फायनल सामन्यात पिसेवाडी संघ विजेता ठरला
फायनल इंग्लिश स्कूल वेळापूर बरोबर झालेल्या अटातटीच्या  सामन्यात पिसेवाडी संघ उपविजेता ठरला.
विद्यार्थाना मुख्याध्यापिका छाया घोडके क्रीडा शिक्षक जालिंदर बनकर, प्रकाश पावरा, शशिकांत कांबळे मारूती धुमाळ ,शिवानी देशमुख , वैशाली तोडमल वनिता ठाकर ;यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहान देण्यासाठी  प्रदिप आवताडे पांडुरंग वाघ किरण काळे  भांडकोळी सर मिसाळ सर नितीन चव्हाण आदी शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीचे रामचंद्र पिसे सचिन पिसे विठ्ठल पिसे जगन्नाथ पिसे आदी  पालक  उपस्थित होते.

No comments