भाईंच्या पालखी सोहळ्यात गवळणीने भरला रंग
भजन, कीर्तन, प्रवचन याबरोबरच नाथांच्या गवळणीने प. पू. भाईंच्या पालखी सोहळ्यात रंगभरला. सायंकाळी हा सोहळा लासुर्णे मुक्कामी विसावला.
श्री क्षेत्र वेळापूर येथील श् री आनंदमूर्ती सेवा मंडळाच्यावतीने आयोजीत केलेल्या श्री क्षेत्र वेळापूर ते श्री क्षेत्र नाशिक या २१ दिवसां च्या पायी दिंडी पालखी सोहळयाने इंदापूर तालुक्यातील रेडणीमुक्कामानंतर लासुर्णे कडे मार्गक्रमण केले. पहाटे रेडणीचे सुरेश पाटील यांनी सपत् निक पादुकांची पूजा व आरती केली. त्यानंतर सकाळी निरवांगी येथे न्याहरी उरकून हा सोहळा नंदेश्वर मंदिरातपोहोचला. येथे अभिजीत रणवरे व परिवाराच्या वतीने सोहळयाचे मोठ्या उत्साही व भक्तीमयवातावरणात स्वागत करण् यात आले. येथे भारूड सम्राट ह. भ. प. लक्ष्मण महाराज राजगुरू यांच्या पाच रंगाच्या पाच गवळणी या गवळणीने रंग भरला आणि अवघा सोहळा भक्तीरसातचिंब झाला.
ह.भ.प.लक्ष्मण महाराज राजगुरू यांना हार्मोनियमची साथ भगवान लोहार यांनी दिली तरपखवाजाची साथ माउली दणाने यांनी व भजनी मंडळाने संगीत साथ दिली. भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारचा नैवेद्य, भोजन व विश्रां तीनंतर हा सोहळा लासुर्णे मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. भाविकांची पावले लासुर्णेच्या दिशेने झपझप पडत होती. कळंब ये थे पालखी सोहळ्याने सायंकाळची विश्रांती घेतली. येथे सतीश बडवे, जगन्नाथ भाकरे, सचिनखरवडे आदींनी पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत केले. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता हा सोहळा लासुर्णे येथील निलकंठेश्वर मं दिरात विसावला.
उद्या दि.१९ रोजी सोहळा सकाळी ६ वाजता बारामती मुक्कामाकडे मार्गस्थ होणार असू नसोहळ्याचा बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुक्काम आहे.
श्री क्षेत्र वेळापूर येथील श्
ह.भ.प.लक्ष्मण महाराज राजगुरू यांना हार्मोनियमची साथ भगवान लोहार
उद्या दि.१९ रोजी सोहळा सकाळी ६ वाजता बारामती मुक्कामाकडे मार्गस्थ होणार असू
No comments