वेळापूर मध्ये मराठा समाजाची बैठक
वेळापूर ता. १९
वेळापूर, ता. माळशिरस येथे काल रविवार ता. १८ रोजी संध्याकाळी इंद्रनील मंगल कार्यालय, वेळापूर येथे मराठा समाजाची मुख मोर्चा नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी ता. २१ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे असलेल्या मूक मोर्चा संबंधी चर्चा, मार्गदर्शन व नियोजन झाले. वेळापूर मधून मोर्चासाठी जाणाऱ्या समाजबांधवांच्या नाष्टा, पार्किंग सोय, वाहतूक सोय, शिस्तबद्ध मोर्चा आदी विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये सर्व समाजबांधवांनी सामील होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या बैठकीसाठी वेळापूर विकास सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, अर्धनारी नटेश्वर देवालय ट्रस्टचे अमृतराज माने देशमुख, विक्रमसिंह माने देशमुख आदींसह
सर्व मराठा समाजातील नागरिक उपस्थित होते.
No comments