श्री क्षेत्र महात्मा फुले गणेशोत्सव मंडळाकडून विविध स्पर्धेचे आयोजन

वेळापूर येथील श्री क्षेत्र महात्मा फुले गणेशोत्सव मंडळाकडून आज विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मंडळाच्या परिसरात सकाळी चित्रकला स्पर्धेचे त्यानंतर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तर दुपारनंतर खास महिलांसाठी फनी गेम्स, वेशभूषा आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेळापूर व परिसरातील चिमुकल्यांनी, तरुण, तरुणींनी, व दुपारी महिलांनी आपला उस्फुर्त सहभाग नोंदवला.
यावेळी मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.







No comments