कोरोना अपडेट । सोलापूरात आज नवे 18 रुग्ण, एकूण संख्या 488 वर

सोलापूरात आज नव्याने 18 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सायंकाळी नव्याने आलेल्या 18 रुग्णांमध्ये 10 पुरुष व 8 महिलांचा समावेश आहे. आज नव्याने वाढलेल्या 18 रुग्ण मुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 488 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आज एकूण 183 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 18 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 165 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

No comments