निमगाव येथे राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धा
वेळापूर ता. २२
निमगाव (म), ता. माळशिरस येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २२५ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ता २४ व रविवार ता. २५ रोजी सकाळी १० वाजलेपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पंचायत समितीचे सदस्य के. के. पाटील, मल्ल सम्राट
रावसाहेब विठोबा मगर,सरपंच हनुमंत पवार, महाराष्ट्र केसरी रावसाहेब भगवान मगर यांच्या हस्ते शनिवारी या स्पर्धेचे उद्दघाटन होणार आहे.
या स्पर्धेला ५०१ रुपये अशी प्रवेश फी आकारली जाणार असून प्रथम क्रमांकाला युवा नेते किरण मगर पाटील यांचेकडून रुपये २१ हजार, व्दीतीय क्रमांकाला भीमराव खराडे यांचेकडून रुपये १५ हजार तर तृतीय क्रमांकाला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान निमगाव यांचेकडून रुपये ११ हजार व चतुर्थ क्रमांकाला राजे प्रतिष्ठान निमगाव यांचेकडून ७ हजार रुपयांचे बक्षीस रविवार ता. २५ रोजी देण्यात येणार आहे.
ह्या कब्बडी स्पर्धा प्रो कब्बडी स्पर्धेच्या नियमानुसार जि.प. प्राथमिक शाळा निमगाव (म) येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी नाव नोंदणीसाठी श्री.कोळके सर (९६८९७९१४०६), श्री. महादेव बोडरे (९७६७८८९९४६), श्री. तानाजी बोडरे (९७६३३२४१११) यांचेकडे करण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

No comments