सुयश जाधव आज भेटणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना; लवकरच वेळापूर मध्ये येणार

वेळापूर लाइव्ह टीम । वेळापूर 

वेळापूर येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू सुयश जाधव लवकरच वेळापूर मध्ये येणार आहे. सोलापूर येथील सदिच्छा भेटीनंतर सुयश आज नरेंद्र मोदी व २४ तारखेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याना भेटणार आहे व त्यानंतर सुयश येत्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस याना भेटणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर लगेचच सुयश वेळापूर मध्ये येणार आहे. 

सुयश हा वेळापूर येथील इंग्लिश स्कुल वेळापूरचा माजी विद्यार्थी आहे. नुकत्याच ब्राझील येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक मध्ये जलतरण स्पर्धेत ५० मीटर फ्रीस्टाईल, ५० मीटर बटरफ्लाय व २०० मीटर वैयक्तिक मिडले या विविध प्रकारात सुयशनी आपला सहभाग नोंदवला होता.

 ५० मीटर फ्रीस्टाईल, ५० मीटर बटरफ्लाय व २०० मीटर वैयक्तिक मिडले या तिन्ही प्रकारात ऑलिम्पिक खेळणारा सुयश हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. 

सुयशने आजपर्यंत ऑल इंडिया जलतरण स्पर्धेत विविध पदकांची लयलूट करीत बेस्ट स्विमर, चॅम्पियनशिप मिळवल्या आहेत. जर्मनी,रशिया व पोलंड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कास्य, रौप्य, सुवर्ण अशी पदके मिळवून सुयशने ऑलिम्पिक स्पर्धेसाठी झेप घेतली होती.

No comments