वेळापूर येथील साई लॉजवरती विषारी औषध पिऊन एकाची आत्महत्या
वेळापूर लाइव्ह टीम । वेळापूर
वेळापूर येथील लॉजवरती शहाजी विलास इंगळे, वय: ३६, रा. चिंचोळी, ता. सांगोला या सोने चांदी दुकानदाराने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
वेळापूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चौकात असलेल्या श्री साई लॉज मध्ये दि. २४ रोजी रात्रीच्या मुक्कामासाठी थांबलेल्या इंगळे यांनी रात्रीच्या वेळी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सदर घटना आज सकाळी लॉजचे व्यवस्थापक वासुदेव पवार हे रूमची स्वछता करण्यासाठी रूमची बेल वाजवल्यानंतर आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने लॉज मालकास सदरील घटनेची माहिती दिल्यानंतर रूमचा दरवाजा उघडून पाहिल्यानंतर सदर घटना लक्षात आली.
मयत इंगळे याचे सोने चांदीचे दुकान अहमदाबाद(गुजरात) या ठिकाणी असून त्यांच्या आत्महत्यांचे नेमके कारण अद्याप समजले नसून व्यापारातील नफा तोट्यावरून निराश होऊन सदरची घटना घडल्याचे नातेवाईकांच्या चर्चेतून समोर येत आहे.
सदर घटनेची खबर लॉज मालक दशरथ अप्पा बनकर यांनी वेळापूर पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास पोलीस नाईक जावेद जमादार हे करीत आहेत.
Velapur live sabse tej
ReplyDeleteVelapur live sabse tej
ReplyDelete