सांगलीत 1 लाख 58 हजारांचा गुटखा जप्त

पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गा वरील येडेनिपाणी फाट्याजवळ केली कारवाई

सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी फाटा येथे 1 लाख 58 हजार रुपयाच्या गुटख्या सह 6 लाख 50 हजाराचा मुद्देमाल कुरळप पोलिसांनी जप्त केला आहे. कुरळप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून येडेनिपाणी फाटा येथे  गुटखा पोती आणि वाहतूक करणारी तवेरा गाडी जप्त केली आहे तर एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील येडेनिपाणी फाट्यावर  ही मोठी कारवाई केली आहे.


No comments