जयंती विशेष । याच' प्रसंगामुळे अहिल्यादेवींचे जीवन पालटले, जाणून घ्या तो प्रसंग !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९५ वी जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवराय यांच्या परंपरेतील लोकराज्याचा वारसा अहिल्यादेवींनी पुढे नेला. अहिल्यादेवींच्या लोकाभिमुख आणि पराक्रमाची खरी परकं केली ती सरदार मल्हारराव होळकर यांनी. असा एक प्रसंग घडला की, त्यांनी अहिल्यादेवींना आपली सून म्हणून घरी आणले.
काय आहे कथा? पुढे वाचा
अहिल्याबाई होळकरांचा जन्म ३१ ऑगस्ट १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या खेड्यात झाला. माणकोजी शिंदे-पाटील यांची अहिल्या नावाची ही मुलगी लहानपणापासूनच धाडसी होती. तसेच राज्यकर्त्यांना आवश्यक असणारे सर्व गुण तिच्याजवळ लहानपणापासूनच होते. एकदा चोंडी गावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता. सीना नदीच्या काठी असलेल्या एका देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्या आपल्या आईबरोबर गेली होती. तेथे नदीच्या वाळूत खेळताना अहिल्येने वाळूचे एक शिवलिंग बनविले. तेवढ्यात सैन्यदलातील एकाचा घोडा उधळला. उधळलेला घोडा आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून अहिल्याबरोबरच्या मैत्रिणी भिऊन पळून गेल्या. मात्र अहिल्या मुळीच डगमगली नाही. तिने आपण तयार केलेल्या शिवलिंगावर पालथे पडून त्या शिवलिंगाचे रक्षण केले.
तेवढय़ात पाठीमागून आलेल्या श्रीमंतांनी थोड्याशा जरबेच्या आवाजातच अहिल्येला म्हटले, पोरी तुला घोड्याने तुडवले असते तर? त्यावर अहिल्याबाई आपले डोळे श्रीमंतांवर रोखत म्हणाली, हे शिवलिंग मी घडविले आहे व आपण जे घडविले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण करावे असे थोरली माणसे सांगतात. मी तेच केले आहे. तिचे बाणेदार उत्तर ऐकून श्रीमंत तर खूष झालेच परंतु त्यांच्याबरोबर असलेले सरदार मल्हारराव होळकर यांनी छोट्या अहिल्येला आपली सून करून घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मल्हाररावांनी तिला आपली सून करून घेतली आणि अहिल्याबाईंनी देखील नंतर मल्हाररावांचा निर्णय सार्थ ठरविला व होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पोहोचविली.
Post Comment
No comments