कोरेगाव भीमा, मराठा आरक्षण आणि नाणार आंदोलनातील गुन्हे मागे - गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानपरिषदेत माहिती
कोरेगाव भीमातील 348, मराठा आरक्षणातील 460 तर नाणार आंदोलनातील 3 गुन्हे मागे; उर्वरित गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु
राज्यातील कोरेगाव-भीमा, मराठा आरक्षण आणि नाणार प्रकल्प आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या तरूणांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. कोरेगाव भीमा आंदोलनातील 649 पैकी 348 गुन्हे तर मराठा आरक्षण आंदोलनातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेत दिली. दरम्यान, गेल्या 5 वर्षात सरकारच्या निर्णयांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात जी शेतकरी आंदोलने झालीत, त्या आंदोलनातील गुन्हेही मागे घेणार असल्याचे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
No comments