सोलापूर येथील शिक्षकाचा अपघात, तिघांचा मृत्यू तिघे गंभीर
सोलापूरातील प्रसिद्ध गणित शिक्षक यल्लाप्पा पेंटप्पा धुळम यांच्या गाडीला तेलंगणातील महबूबनगर येथे अपघात झाला यामध्ये परिवारातील तीघांचा जागीच मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी तर चारजण जखमी झाले आहेत जखमींवर हैदराबाद आणि तेलंगणा येथील रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती परिवारातील सदस्यांनी दिली.
यल्लाप्पा पेंटप्पा धुळम हे सहपरिवार तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी निघाले होते 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास तेलंगणातील महबूबनगर येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला अपघातात स्वप्ना राजू कुनी, शारदा रामकृष्णाहरी कुनी, दत्तात्रय पेंटप्पा धुळम यांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी तर पाचजण जखमी झाले आहेत गंभीर जखमींवर हैदराबाद येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींवर महबूबनगर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
No comments