निर्भया प्रकरण : तीन मार्च ला देणार फाशी

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींना ३ मार्चला फासावर लटकवलं जाणार आहे. चारही नराधमांना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार आहे. कोर्टाने नवं डेथ वॉरंट जारी केलं आहे. त्यानुसार या चारही दोषींची फाशीची तारीख ३ मार्च ही ठरली आहे. दोषींकडे अद्यापही कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचं आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे.

No comments