पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फोन घेत त्याने घेतला पहिला सेल्फी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रयागराजमध्ये २६ हजार ७९१ दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहायता उपकरणांचे वाटप केले. या वेळी त्यांनी काही दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मंचावर बोलावले. या वेळी त्यांनी दृष्टीबाधित युवक विवेकमणी त्रिपाठी याला एक विशेष स्मार्टफोन आणि एक स्टिक दिली. पंतप्रधानांकडून स्मार्टफोन मिळल्यानंतर त्याचा आनंद विवेकमणीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.


No comments