सॅल्यूट! माधुरी कानिटकर बनल्या लेफ्टनंट जनरल
माधुरी कानिटकर यांनी आज लेफ्टनंट जनरल पदाची सूत्रे स्वीकारली. लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचणाऱ्या माधुरी कानिटकर या तिसऱ्या महिला अधिकारी आहेत. माधुरी कानिटकर यांनी नवी दिल्लीत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या अंतर्गत असलेल्या इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफचे (डीसीआईडीएस ) उपप्रमुख पद आणि मेडिकल (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ)नुसार कार्यभार स्वीकारला. संरक्षण विभागाने माधुरी कानिटकर यांच्या पदोन्नतीला शुक्रवारी मंजुरी दिली होती.
No comments