इराण मध्ये अडकलेल्या भाविकांच्या सुटकेसाठी मोहिते पाटील बंधूंचे प्रयत्न

इराण इराक या ठिकाणी अकलूज व सांगोला भागातील अडकलेल्या ४४ भाविकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय दूतावास शी पत्रव्यवहार केला आहे. 
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज व सांगोला या ठिकाणचे भाविक देवदर्शनासाठी बगदाद या ठिकाणी जात असताना इराण येथील तेहरान या ठिकाणी कोरोनो व्हायरस मूळे त्याना अडकून पडावं लागलं आहे. 
त्यांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय दूतावास, राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह मुख्यमंत्री यांना मेल करून मदत मागितली आहे.
या भाविकांना सुखरूप भारतात आणण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचेही मोठे प्रयत्न सुरू आहेत.

No comments