प्लास्टिक मुक्ती साठी युवासेनेचे जनजागृती अभियान


अकलूज शहरात युवासेनेची गांधीगिरी  
अकलूज शहरातील प्लास्टिकचे वाढते प्रमाण पहाता युवासेना अकलूज शहर च्या वतीने अकलूज शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी युवासेना अकलूज शहर प्रमुख शेखर भैय्या खिलारे यांच्या नेतृत्वाखाली अकलूज शहरांमध्ये अभियान  चालू केले आहे.प्लास्टिकचे प्रमाण बऱ्याच अंशी वाढले असून. ज्या ठिकाणी शहरात कचराकुंड्या आहेत.त्यामधील प्लास्टिक खाऊन भटकी जनावर जिवाला मुकत आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन युवासेना अकलूज शहराच्या वतीने प्लास्टिक मुक्त जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे.स्वतः युवासैनिक गल्लो-गल्ली व रस्त्यावरून फिरून प्लास्टिक गोळा करत आहेत.या अभियानाला आजपासून लोणार गल्ली अकलूज येथून सुरुवात झाली.हे अभियान अकलूज मध्ये पूर्ण शहरात चालणार आहे. असे युवासेना अकलूज शहर प्रमुख शेखर भैय्या खिलारे यांनी सांगितले.आजच्या या फेरीमध्ये १० ते १२ बॅग प्लास्टिक जमा झाले आहे.सदर अभियानात युवासेना अकलूज शहर प्रमुख शेखर भैय्या खिलारे,किरण भांगे, अतिषकुमार गायकवाड, रोहित साळुंके, विकी धोत्रे,नितीन धोत्रे, अनिल तिवारी, विशाल पवार, गणेश शिंदे,अक्षय धोत्रे,अजिंक्य पासगे, प्रज्वल जोंधळे, चेतन खिलारे, किरण नरळे,अश्या अनेक युवकांनी प्लास्टिक मुक्ती साठी परिश्रम घेतले.

No comments