वेळापूरात राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा
शिवजयंती व अकलूज गावचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने वेळापूर, ता. माळशिरस येथील पालखी मैदानावर गुरुवार, दि. २० फेब्रुवारी पासून राज्यस्तरीय भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा नेते स्वप्नील भैय्या माने देशमुख यांनी दिली.
या सामन्यात ३१, २१ व ११ हजार रुपये अशी प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके विजेत्या संघाला देण्यात येणार असून वैयक्तिक बक्षिसात मॅन ऑफ द मॅच साठी १ हजार, मॅन ऑफ द सिरीज साठी १ हजारव उत्कृष्ट गोलंदाजास एक हजार अशी पारितोषिके आयोजकांकडून देण्यात येणार आहेत.
या सामन्यात सहभागी होण्यासाठी प्रत्येक संघास प्रवेश फी रुपये ४ हजार घेण्यात येणार आहे. मित्र स्पोर्ट्स, अर्धनारी क्रिकेट क्लब, आझाद क्रिकेट क्लब व बजरंग दलाच्या साहाय्याने हे सामने आयोजित करण्यात आले आहेत.
No comments