अवैध गुटखा, आता या नंबर वर करा फोन नि द्या माहिती
अवैध गुटख्यासंबंधी तातडीने माहिती देण्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन
• आतापर्यंत 226 कोटी किंमतीचा गुटखा जप्त
• नऊ वाहनांचा परवाना रद्द
राज्यात गुटखाबंदी आहे, मात्र बाहेरील राज्यातून अवैधरित्या गुटखा आपल्या राज्यात आढळल्यास त्या विषयी तातडीने तक्रार करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 222 365 या क्रमांकावर, 022-26592361 ते 65 किंवा comm.fda-mah@nic.in या ई मेल पत्त्यावर तक्रार केल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे.
No comments