तांदुळवाडी येथिल बँक फोडण्याचा प्रयत्न फसला
कोणीतरी अज्ञात चोरटयाने सोलापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तांदुळवाडी येथील इमारतीचे वरील जिन्याच्या उघडया दरवाज्यातुन आत जावुन आतील शट्टर उचकडून आत प्रवेश करुन आतील ग्रिल दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून आत जावून तिजोरीची साईरनची वायर तोडून तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मात्र बँकेचा सिक्युरिटी सायरन वाजल्याने सदर चोरीचा प्रयत्न फसला आहे.
याबाबत वेळापूर पोलिसांत बँकेचे शाखा अधिकारी धनाजी पितांबर माने यांनी फिर्याद दिली आहे. वेळापूर पोलिसांत नोंद झाली असून अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि 457, 511 नुसार गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास हेकॉ भागवत झोळ करीत आहेत.
No comments