पीडितांची ओळख उघड करणाऱ्यांवर काय कारवाई?


बलात्कार व लैंगिक अत्याचार पीडितांचे नाव, छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध करून त्यांची ओळख उघड करणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम २२८-अ अन्वये दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांविरोधात कोणती कारवाई करणार, अशी विचारणा करत याविषयी भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी दिले.

No comments