दिल्ली हिंसाचार: सुप्रिया सुळेंनी केंद्राला सुनावलं!


'मागील पाच वर्षे पारदर्शक काम केल्याचा दावा करणाऱ्या केंद्र सरकारने दिल्लीतील हिंसाचारावरून त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर द्यायला हवं. दिल्ली हिंसाचाराच्या काळात गृहमंत्रालय नेमकं काय करत होतं?, याची चौकशी पंतप्रधान कार्यालयातून झालीच पाहिजे व त्याची जाहीर माहिती दिली पाहिजे,' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. 'अमित शाहांच्या जागी मी असते तर निश्चितच आत्मचिंतन केले असते,' असंही त्या म्हणाल्या.


No comments