IPL मॅच फिक्सिंग उघड करणारे एसएन श्रीवास्तव दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त

एस. एन. श्रीवास्तव दिल्लीचे नवे पोलिस आयुक्त

सतत ४ दिवस चाललेल्या दिल्लीतील हिंसाचारानंतर आता पोलिस दलाचे नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी दिल्लीच्या विशेष पोलिस आयुक्तपदी (कायदा आणि सुव्यवस्था) नियुक्त करण्यात आलेले एस. एन. श्रीवास्तव हे आता दिल्लीचे पोलिस आयुक्त बनले आहेत १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले श्रीवास्तव यांचा कार्यकाल १ मार्चपासून सुरू होत आहे. दिल्लीचे विद्यमान पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांचा कार्यकाल ३१ जानेवारीला संपुष्टात आला होता.




No comments