मराठा लाभार्थ्यांना कर्ज न दिल्यास शासकीय ठेवी काढू : पाटील

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज मागणी करणार्‍या मराठा समाजातील लाभार्थ्यांना कर्ज वितरित न करणार्‍या बँकांमधून शासकीय ठेवी आणि आर्थिक व्यवहार बंद करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देऊ, असा इशारा महामंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आज सोलापुरात दिला.

महामंडळाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी सोलापुरात आलेले पाटील यांनी शनिवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, अग्रणी बँकेचे संतोष सोनवणे आदींसह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

No comments