स्वतःचा जीव धोक्यात घालून तिरंगा वाचविणाऱ्या तरुणाचा सन्मान

माझगाव येथील जीएसटी भवनला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत जीवाची पर्वा न करता इमारतीवरील राष्ट्रध्वज सुखरूप खाली आणणाऱ्या कुणाल जाधव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला. सह्याद्री राज्य अतिथीगृहात आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या सत्कारास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार आदी मंत्रीही उपस्थित होते.


No comments