शिवजयंती । वेळापूरच्या मोहिते-पाटील विद्यालयात शिवजयंती साजरी
येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यालयाचे सभापती सतीशराव माने-देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.यावेळी स्टेजवरती प्रमुख अतिथी डॉ दत्तात्रय मगर,ओंकार माने-देशमुख,चंद्रकांत क्षिरसागर, दिपक राऊत,आण्णासो चव्हाण-पाटील,सतीश नवले,डॉ सुरज राऊत,विठ्ठल वाघे,मुख्याध्यापक सुरेश साळुंखे, पर्यवेक्षक युवराज जरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश साळुंखे यांनी प्रास्ताविक केले तर प्रमुख अतिथी डॉ दत्तात्रय मगर यांचा परिचय नागेश सोनवणे यांनी करून दिला.
विद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉ सुरज राऊत व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ दत्तात्रय मगर यांनी मनोगत व्यक्त केले व शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा दिला. विद्यालयातील विद्यार्थी तेजस साळुंखे,मानसी कुलकर्णी व सृष्टी नवले यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा माने-देशमुख हिने केले तर आभार पायल केंगार हिने मानले
No comments