राजधानी दिल्लीत वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसह 'शिवजयंती सोहळा'



10 देशांचे राजदूत प्रमुख पाहुणे, हणमंतराव गायकवाडांना छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार

शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात 10 देशांचे भारतातील राजदूत प्रमुख पाहुणे असणार आहेत, अशी माहिती खासदार संभाजी छत्रपती  यांनी आज दिली.

बीव्हीजी समुहाचे प्रमुख तथा प्रसिध्द उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना यावर्षीच्या सोहळ्यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


No comments