'दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री गुरूवारी जाणार आंध्र प्रदेशला
महिलांवरील अत्याचारांविषयी राज्यशासन संवेदनशील असून याबाबत राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने आंध्र प्रदर्शने केलेल्या 'दिशा' कायद्याची माहिती घेण्यासाठी आपण स्वतः गृहराज्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आंध्रप्रदेशला जाणार आहोत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
No comments