ठिबक सिंचन अनुदान, २० फेब्रुवारी पर्यंत करा अर्ज
ठिबक सिंचन केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा प्रस्ताव सादर करावा लागतो. या वर्षी अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत अंतिम तारीख देण्यात आली आहे. मार्च एण्ड असल्यामुळे बनावट प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता असल्याने मोका तपासणीवेळी कृषी सहायकांनी संबंधित शेतकऱ्यांचा सातबारा पडताळणी करून मालकी तपासावी, असे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत. तसेच महिन्यात प्रस्ताव न दिलेल्या तब्बल ८० हजार शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झाले आहेत.
२०१९- २० मध्ये राज्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करून अनुदानासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. पूर्वसंमती मिळूनही मुदतीत प्रस्ताव न दिलेल्या शेतकऱ्यांचे सर्वाधिक अर्ज जानेवारी व फेब्रुवारीत रद्द ठरविण्यात आले आहेत. अनुदानाचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी मुदत जाहीर केल्याने महिन्याला ३० ते ३२ हजार अर्ज येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
No comments