पत्रकार शाहरुख मुलाणी यांना युवा पत्रकार पुरस्कार
कोळेगाव, ता. माळशिरस येथील धडाडीचे पत्रकार शाहरुख मुलाणी यांना बहुजन ब्रिगेड चा तालुकास्तरीय "युवा पत्रकार" नुकताच जाहीर झाला आहे.
दि. ०१मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पुरस्कार वितरण सोहळा अकलूज येथे पार पडणार असून त्याठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलाणी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
शाहरुख मुलाणी हे मूळचे कोळेगाव येथील रहिवाशी असून पत्रकार सोबतच त्यांचा फोटोग्राफी चा व्यवसाय ही आहे. या दोन्हीचा संगम करीत मुलाणी यांनी समाजातील अनेक प्रश्न प्रशासनासमोर आणून ते मार्गी लावले आहेत.
होतकरू व धडाडीचे पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे.
No comments