अकलूज येथे राज्यस्तरीय शाहीर परिषद

अकलूज, ता. माळशिरस येथे राज्यस्तरीय शाहीर स्पर्धा व परिषद आयोजित करण्यात आली असून यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून नामवंत शाहीर उपस्थित राहणार आहेत.  

बुधवार दिनांक ११ / ३ / २०२० सकाळी ९ ते सायं . १० पर्यंत . शाहीर परिषद व स्पर्धा, गुरूवार दिनांक १२ / ३ / २०२० सायं . ४ ते ७ वा . भव्य मिरवणूक, सायं . ७ ते १० वा . बक्षीस वितरण समारंभ व शाहीर फायनल स्पर्धा व्याख्यान अश्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

" छत्रपती शिवजयंती महोत्सव समिती माळशिरस तालुका व महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना" यांचे संयुक्त विद्यामाने व आपले सर्वांचे सहभागाने बुधवार दि . ११ / ०३ / २०२० रोजी सकाळी ९ वाजता विजयचौक - अकलूज येथे संपूर्ण भारतभरातील मान्यवर शाहिरांची शाहिर परिषद व स्पर्धा आयोजित केली असून गुरूवार दिनांक १२ / ३ / २०२० रोजी शिवजयंतीचे औचित्य साधुन आपले सर्वांचे साक्षीने व सहभागाने भव्यदिव्य शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. 

छत्रपती शिवजयंती महोत्सव समिती माळशिरस तालुका अध्यक्ष डॉ . धवलसिंह प्रतापसिंह मोहिते - पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.  

No comments