लोकविकास मध्ये दहावी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ


    लोकविकास मराठी मिडीयम स्कूल वेळापूर स्कूल मध्ये सन 2019-20मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा.वैशाली बनकर, मुख्याध्यापक किशोर पिसे, क्रीडा शिक्षक अजित बनकर, विभाग प्रमुख अमोल पांढरे शिक्षक वर्ग सुनिल पताळे, राया वाघमारे, सिन्नापा शेंडगे, अमोल साठे, विजया चापले, कल्पना पांढरे व इयत्ता दहावी चे सर्व विद्यार्थी आणि संयोजक नववी चे विद्यार्थी उपस्थित होते. 
             कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुणे च्या हस्ते  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आली.दहावीतील सर्व विद्यार्थीनी आपले विचार मांडले त्या मध्ये त्यांनी शाळेत प्रवेश घेतल्या  पासून आम्ही कशा प्रकारे घडलो या विषयी आपले मत व्यक्त केले. तसेच शिक्षक सुनिल पताळे, राया वाघमारे, अमोल साठे, सिन्नापा शेंडगे, विजया चापले यांनी ही अनमोल असे मार्गदर्शन केले. 
        कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमोल पांढरे यांनी मुलांना पुढील शिक्षणासाठी कोणकोणत्या संधी आहेत ते सांगीतले व विज्ञान शाखेचे महत्त्व पटवून दिले.अजित बनकर यांनी क्रीडा क्षेत्रात ही संधी आहेत  त्यातून आपल्या ला गुण वाढवता येतात. 
        किशोर पिसे यांनी शाळेचे नाव लोकविकास आहे आजचे विद्यार्थी उद्याचे भावी नागरिक आहेत अशा मुलांचा विकास करणे म्हणजे  लोकविकास,असे मनोगतातून व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात वैशाली बनकर  यांनी मुलांनी प्रत्येक गोष्टीस आत्मविश्वासाने सामोरे जावे तसेच ज्या अपेक्षा दहावी च्या विद्यार्थ्यां कडून ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण कराल,अशा विविध बाबीवर  मार्गदर्शन करून  विद्यार्थीना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती जाधव, प्रास्ताविक प्रणव म्हेत्रे व आभार आमॄता शेंडे यांनी मांडले.

No comments