दूध वितरकांच्या मागण्यांसंदर्भात दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
महाराष्ट्र दूध वितरक सेनेच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी आमदार रविंद्र वायकर, पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त नरेंद्र पोयाम, सहसचिव माणिक गुट्टे, ‘महानंद’चे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी पहिनकर, महाराष्ट्र दुग्ध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम आदी उपस्थित होते.
No comments