'या' रिक्षावाल्यांची कहाणी डोळ्यात आणते पाणी
ईशान्य दिल्लीत उसळलेल्या दंगलीमध्ये शेकडो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. हिंदू-मुस्लिम, श्रीमंत, गरीब, दुकानदार आणि रिक्षाचालक असे सर्वच या हिंसाचाराचे शिकार बनले. दिल्लीत अशाच दोन रिक्षा ओढणाऱ्यांची कहाणी तुमच्या डोळ्यात पाणी आणल्यावाचून राहणार नाही. त्यांपैकी एक मुलासाठी दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला असताना दंगलखोरांनी त्याची हत्या केली, तर दुसऱ्याच्या घरालाच आग लावण्यात आली.
No comments