माळशिरस । गारवड येथील विकासकामांचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते भूमिपूजन
माळशिरस तालुक्याचे आमदार राम विठ्ठल सातपुते यांच्या शेष फंडातून मौजे गारवाड येथे मंजूर झालेल्या सभामंडपाचे भूमिपूजन व रमाई आवास घरकुल योजनतेतून मंजूर झालेल्या घरकुलाचे भूमिपूजन पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विजयसिह मगर, विजय मगर, मल्हारी करडे, तानाजी मगर, दिलीप मगर, राघू मगर, दादा पाटील, तात्या लोंढे, पांडुरंग मगर, सतीश मगर, कुंडलिक साठे, आबा करडे, उमेश माने, राजशेखर मगर, रमाई आवास घरकुल योजनचे लाभार्थी दत्तू शिवाजी करडे, ग्रामविकास अधिकारी देशमुख भाऊसाहेब व गारवाड गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments