अकलूज । मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालय,अकलूजअभ्यास केंद्रात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी अभ्यास केंद्रांचे केंद्र प्रमुख महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.आबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण यांनीआर्थिकदृष्ट्या मागास विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सुरू केल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासात परिवर्तन झाले. असे विचार त्यांनी व्यक्त केले. यावेळी अभ्यास केंद्राचे संयोजक डॉ.बाळासाहेब मुळीक,डॉ. दत्तात्रय बागडे,प्रा.विष्णू सुर्वे,डॉ.बाबर सर,प्रा.प्रसाद लोहार,प्रा.सोनवणे सर,केंद्र सहायक श्री .रणजित गायकवाड,श्री बावळे व महाविद्यालयातिल विध्यार्थी उपस्थित होते.
No comments