श्रीनिवास मोने, इगे यांच्या वाणांना प्रथम क्रमांक । राज्यस्तरीय हातमाग कापड स्पर्धेला विणकरांचा प्रतिसाद
श्रीनिवास ईरण्णा मोने यांच्या रेशीम साडीस आणि श्रीनिवास बालण्णा इगे यांच्या गणपती वॉल पीसला हातमाग कापड स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे विभागून बक्षिस मिळाले. त्यांना प्रत्येकी 12500 रुपयांच्या बक्षिसाने गौरव करण्यात आला.
सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघ येथे आज राज्यस्तरीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हातमाग व्यवसायातील विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेत पारंपारिक आणि अपरंपरागत हातमाग वाणांचा समावेश होता. स्पर्धेत 41 विणकर स्पर्धकांनी आपल्या 132 वाणांचा सहभाग नोंदवला होता.
वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त किरण सोनवणे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक एस.पी.काकडे,सहाय्यक आयुक्त किशन पवार, टेक्स्टाईल डिझाईनर जयंत मंगलपल्ली शास्त्रीय तंत्रनिकेतनच्या वस्त्रोद्योग विभागाचे प्रभारी प्रमुख एन. वाय. नादरगी, महाटेक्सचे संचालक गणपत कुरपाटी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेचाा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :- द्वितीय क्रमांक विभागून अशोक टिपरे, कृष्णहरि पोराम, गोवर्धन दुधगुंडी, जयश्री मोने (प्रत्येकी पाच हजार रुपये रोख) तृतीय क्रमांक विभागून गणपती सणगर, नागनाथ गेंट्याल, ईरेशम्मा रोडा, अंबादास भारत, काशीनाथ सातलगाव (प्रत्येकी तीन हजार रुपये रोख)
No comments