कोरोनो । श्रप्तशृंगी गडावरील चैत्री यात्रा स्थगित
जागतीक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात सुमारे ११४ देशामध्ये १ . २५ लाख लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे . तसेच देशामध्ये १०५ व महाराष्ट्रामध्ये ३३ लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे . या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गर्दी कमी करणे बाबत शासनाचे निर्देश आहेत . मा . प्रधान सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील दि . १४ / ०३ / २०२० रोजीचा आदेश क्र . करोना २०२० / प्रा . क्र . ५८ / आरोग्य - ५ नुसार नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्यात सामाजिक , राजकीय , सांस्कृतीक , धार्मिक व क्रिडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होई पावेतो परवानगी देण्यात येवू नये असे निर्देश दिलेले आहेत . श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव २०२० यात्रा दि . ०२ / ०४ / २०२० ते दि . ०८ / ०४ / २०२० या कालावधीमध्ये सालाबाद प्रमाणे नियोजीत आहे . सदर यात्रा दरम्यान नंदुरबार , धुळे , जळगाव , नाशिक व इतर राज्यातून सुमारे ७ ते ८ लाख भाविक श्री भगवती दर्शनासाठी गडावर येण्याची शक्यता आहे . करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सदर गर्दीच्या माध्यमातून मोठया प्रमाणात विषाणूचा संसर्ग / प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे . करोना विषाणूचा प्रसार होवू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या उपरोक्त आदेशानसार प्रशासन , विश्वस्त संस्था व ग्रामपंचायत , सप्तशृंगगड / नांदुरी यांच्या वतीने संयुक्तीकरित्या निर्णय घेवून चैत्रोत्सव २०२० यात्रा रद्द करणे बाबत निर्णय घेतला आहे . त्यामुळे चैत्रोत्सव व त्या अनुषंगाने सालाबाद प्रमाणे चैत्रोत्सवात विशेष नियोजनासह भाविक वर्गासाठी दिल्या जाणाऱ्या विविध सेवा - सुविधा उपलब्ध नसतील . सदर साथीच्या आजाराची गांभिर्यता विचारात घेता भाविकांची श्री भगवती वरील नितांत श्रध्दा इतकीच त्यांच्या जिवीताची योग्य ती काळजी घेणे या उद्देशाने सदरचा महत्वपुर्ण निर्णय संयुक्तीकरित्या घेण्यात आला आहे . दरम्यानच्या काळात दैनंदिन पुजा व आरती वगळता इतर कोणतेही धार्मिक उपक्रम , मोफत अन्नदान , निवास व्यवस्था तसेच सातत्यपुर्वक भगवतीचे दर्शन व्यवस्था उपलब्ध नसेल . याची भाविकांनी नोंद घ्यावी . भाविकांनी महाराष्ट्र शासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या आदेशानुसार योग्य ती खबरदारी घेवून करोना विषाणू संसर्ग रोखणेकामी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग ( राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क पुणे ) यांनी देवू केलेल्या खालील बाबींची योग्य ती खबरदारी घेणे बाबत जिल्हा प्रशासन , विश्वस्त संस्था व ग्रामपालिका , सप्तशृंगगडच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे .
No comments