वेळापूर । अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, संचलित अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, वेळापूर येथे इतिहास विभाग व सास्कृतीक विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि छत्रपती संभाजी महाराजांना पुन्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थांन आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्रा. अपर्णा गुरव यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या शैक्षणीक कार्यांला वंदन केले तसेच छत्रपती संभाजी महाराजांची बलीदान गाथा कथन केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील ग्रंथपाल सौ. वैशाली मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. पाडूरंग भोसले यांनी केले. प्रास्तावीक प्रा. आशा गायकवाड यांनी तर आभार प्रा. उर्मीला कोडग यांनी मानले.

No comments